Elections 2022 : Uttar Pradesh च्या निवडणुकीनंतर भाजप आणखी प्रबळ होणार?

Continues below advertisement

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचा जादू पुन्हा चालली आहे. योगींच्या मॅजिकपुढे विरोधकांची अवस्था दयनीय झाली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि बसपाचा सूपडा साप झाला आहे. या दोन्ही पक्षांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने तोकडी फाईट दिली, पण भाजपला सत्तास्थापणेपासून राखू शकले नाहीत. 

सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 269 जागांवर दावा ठोकला आहे. 403 विधानसभा जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 202 जागांची गरज असते. भाजपने ही मॅजिक फिगर पार केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगींची जादू पुन्हा चालली आहे. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला 129 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेस पक्षाला फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. तर बसपा फक्त एका जागेवर जिंकली आहे. तर जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram