Sanjay Raut : गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार | Goa

Continues below advertisement

Goa Assembly Elections 2022 : गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं (Shivsena) आपल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 10 ते 12 जागी निवडणुक लढवणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच पणजीमधून शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. 

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा नवा पक्ष नाही. आपण गेल्या काही वर्षांपासून पाहताय, जरी काही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं, तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करतेय. गोव्यातील निवडणुका आम्ही 2017 मध्येही लढवल्या होत्या. यावेळी गोव्याचं राजकारण, गोव्याच्या निवडणुका, एकंदरीत राजकारण हे काही आशादायी दिसत नाही, सर्वांसाठीच. गोव्याच्या जनतेसाठी. वातावरण पूर्ण गढूळ झालंय. अनेक राजकीय पक्ष नव्यानं उतरले आहेत. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. नक्की कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढत आहेत, हेदेखील स्पष्ट होत नाही." 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram