ABP-C Voter Opinion Poll| Punjab Election 2022:पंजाबमध्ये काँटे की टक्कर, यंदा आकडे कुणाच्या बाजूने?
Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. एकीकडे काँग्रेसने जुन्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलून चरणजितसिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून सत्ताविरोधी लाट कमी करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरली आहे. पंजाबमध्ये मुख्य लढत ही आप आणि काँग्रेसमध्येच असल्याचं दिसून येतंय. यामध्ये आप सत्तेत येण्याची शक्यता असून आपला 52 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. अकाली दलाला 17 ते 23 आणि भाजपला केवळ 1 ते 3 जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे.
Tags :
Punjab Election Punjab Election 2022 Punjab Assembly Election 2022 Punjab Elections 2022 Punjab Election 2022 News Punjab Election News