ABP-C Voter Opinion Poll| Goa Election 2022 : गोव्यात कुणाचं सरकार, ओपिनियन पोल कुणाच्या बाजूने?

Continues below advertisement

ABP CVoter Survey Assembly Election 2022 :   पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. यूपी, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. पुढील काही  दिवसांत गोव्यात  विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजणार आहे. त्यामुळे येथील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहेत.  सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, आप आणि  इतर पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.  गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पार्टीनं (GFP) काँग्रेसशी (Congress) आघाडी केलीय.  अशातच एबीपी न्यूजने सी-वोटर सर्व्हेच्या माध्यमातून गोव्यातील  जनतेचा कौल जाणून घेतलाय. यासाठी गोव्यातील  जनतेला विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.  या सर्व्हेत गोव्यात भाजपला  19 ते 30, आपला 5 ते 9, काँग्रेसला 4 ते 8, मगोप 2 ते 6 तर इतर पक्षांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे.  तर गोव्यात भाजपला 32 टक्के, आपला 22.5 टक्के, कॉंग्रेसला 19.8, मगोपला 7.7 टक्के आणि इतर पक्षांना 18.1  टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram