AAP As National Party : Gujarat-Himachal च्या निकालानंतर आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार?

Continues below advertisement

गुजरात आणि हिमाचल प्रदेशचे निकाल अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ऐतिहासिक असणार आहेत. कारण या दोन्ही राज्यांच्या निकालानंतर आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर गुजरात आणि हिमाचलच्या निकालांतील टक्केवारी आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देऊ शकते. लोकसभेत चार खासदार असण्यासोबतच चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सहा टक्के मतांचा निकष आम आदमी पार करू शकते. तसं झालं तर राष्ट्रीय पक्षाला असणाऱ्या सुविधा आपलाही मिळू शकतात. राजधानी दिल्लीत कार्यालय आणि पक्षाला राष्ट्रीय पातळीवरचं निश्चित असं निवडणूक चिन्हही मिळत असत. त्यामुळे गुजरात आणि हिमाचलचे निकाल आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवतात का हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram