Gujarat Assembly Election Result 2022 : गुजरात विधानसभेचं मैदान कोण मारणार?
Gujarat Assembly Election Result 2022 Live Updates: गुजरात विधानसभेचं (Gujarat Assembly Election) मैदान कोण मारणार हे येत्या काही तासातच समजणार आहे. त्यावरच दीड वर्षानंतर होणाऱ्या लोकसभेचा (Lok Sabha Elections) ट्रेंडही सेट होणार आहे. मोदी-शाहांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत भाजपशी (BJP) काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पार्टीची (Aam Aadmi Party) थेट लढत झाली आहे. त्यामुळे विजय कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता वाढली आहे.
गुजरातमध्ये भाजपची 27 वर्षापासून सत्ता आहे. त्यातली 12 वर्ष स्वत: मोदीच (PM Narendra Modi) गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी (Chief Minister of Gujarat) होते. मात्र कोविडमध्ये (Covid-19) लोकांचे झालेले हाल, महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) या मुदद्यांमुळे ही इलेक्शन (Election) गाजली. मोदी (PM Modi) आणि शहांनी (Amit Shah) मिळून पन्नासहून अधिक सभा आणि रॅली केल्या. तरीही मतदारांचा उत्साह वाढला नाही.