VIDEO | महाराष्ट्रातील मतोत्सवाच्या समाप्तीनंतर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद | एबीपी माझा

Continues below advertisement

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आणि महाराष्ट्रातील मतदान आज पूर्ण झालं. चौथ्या टप्प्यात एकूण 17 मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडली. यात 57 टक्के मतदानाची नोंद झाली असून राज्यात 61 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. तसंच ही आकडेवारी 2014 च्या आसपार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. यंदा मतदानाच्या टक्केवारीत गडचिरोलीनं पहिला नंबर मारला आहे. गडचिरोलीत 72 टक्के मतदान झालं तर कल्याणमध्ये सर्वात कमी 44 टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगाने दिली आहे. दरम्यान, राज्यातील मतदानाची आकडेवारी 2014 एवढीच असल्यानं यंदा राज्यातील राजकीय चित्र बदलणार का, अशी चर्चा आता सुरु झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram