ठाणे : वाहनं पिवळ्या रेषेच्या बाहेर असल्यास टोल नाही : एकनाथ शिंदे
ऐन गर्दीच्या काळात जर टोलनाक्यांवर वाहनांची रांग पिवळ्या रेषेबाहेर जात असेल, तर टोल कंपन्यांकडून होत असलेली वसुली चुकीची आहे, असं एमएसआरडीसी खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तसंच पिवळ्या रेषेबाहेर रांग गेल्यास वसुली करु नये, असे आदेशही आपण दिल्याचं सांगितलं. मात्र या निर्णयाचा अध्यादेश किंवा शासन आदेश आहे का? या प्रश्नावर शिंदेंनी उत्तर दिलं नाही.