मुंबई : बेछूट आरोप करणाऱ्यांवर कारवाई का नाही, एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Continues below advertisement
प्रशांत परिचारक यांचं निलंबन, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर झालेला पक्षपातीपणाचा आरोप या मुद्द्यांबरोबरच आज एकनाथ खडसेंना त्यांच्यावरच्या आरोपांबाबत सरकारला जाब विचारला. आपल्यावर झालेल्या एकाही आरोपात तथ्य निघालेलं नाही, मग आता सरकार त्या आरोप करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही, असा थेट प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यामुळे बेछूट आरोप झाल्यानंतर ज्याप्रकारे चौकशी केली जाते, त्याचप्रमाणे त्यात काहीही आढळलं नाही. तर आरोप करणाऱ्यांवर तातडीची कारवाई झाली, पाहिजे, असं खडसे म्हणाले. खडसे यांच्यावर भोसरी इथं स्वस्तात जमीन लाटल्याचा आरोप झाला. याप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून ते भाजपवर नाराज आहेत.
Continues below advertisement