स्टीफन हॉकिंग... एक होता जीनिअस : लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्याशी बातचित

Continues below advertisement
जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे.

केंब्रिजमधील निवासस्थानी बुधवारी सकाळी हॉकिंग यांची प्राणज्योत मालवली. हॉकिंग यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात ल्युसी, रॉबर्ट आणि टीम ही तीन मुलं आहेत. 'आमचे वडील महान शास्त्रज्ञ होते, त्यांचं कार्य पुढील अनेक वर्ष स्मरणात राहील' अशा भावना हॉकिंग यांच्या मुलांनी व्यक्त केल्या.

भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी (विश्वनिर्मिती) या क्षेत्रात हॉकिंग यांचं भरीव योगदान आहे. बिग बँग थिअरी, सापेक्षतावाद आणि कृष्णविवरावरील त्यांचं कार्य जगप्रसिद्ध आहे. विपुल वैज्ञानिक पुस्तकांचं लेखन हॉकिंग यांनी केलं होतं. आईन्स्टाईननंतरचे मोठे शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram