School Reopen : राज्यातील शाळा, महाविद्यालयं दिवाळीनंतर सुरू? काय म्हणाले उपमुख्यमंत्री Ajit Pawar ?
मुंबई : राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार? असा प्रश्न अनेकांना पडलाय. यावर राज्यातील चाइल्ड टास्क फोर्सने कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास शाळा दिवाळीनंतर सुरू कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत याआधी शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासोबत तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता अनेक मोठ्या शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.