पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी 50% क्षमतेसह कोचिंग क्लासेसला परवानगी - महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच प्रशासनानं पुणेकरांवर कुठलेही नवे निर्बंध न लादण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण वाढवण्यावर आणि आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर देण्याचा निर्णय घेतला. कोरोना संसर्ग सर्वाधिक वेगानं वाढत असल्यानं लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावं, अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.