Mumbai University अंतर्गत प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची यादी जाहीर,नामांकित Colleges चा Cut Off 90% पार
मुंबई : मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कॉलेजची पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यंदाचा बारावीचा निकाल पाहता नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ नव्वदीपार गेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजचा कट ऑफ हा नव्वदीपार पाहायला मिळतोय. विशेषतः काही नामांकित कॉलेजमध्ये 3 ते 4 टक्क्यांनी कट ऑफ वाढलेला पाहायला मिळतोय.
नामांकित महाविद्यालयांची कला शाखेची गुणवत्ता यादी नव्वदीपार तर काही ठिकाणी 95 टक्क्यांच्या वर आहे. कला शाखेप्रमाणेच वाणिज्य व विज्ञान शाखेपेक्षा विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सेल्फ फायनान्स (स्वयं अर्थसहाय्यित) अभ्यासक्रमांना आपली पसंती विद्यार्थ्यांनी यंदाही दर्शविली आहे.
बीएमएस, बीएमएम , बायोटेक्नॉलिजी, बीएस्सी आयटी या अभ्यासक्रमांना पदवी प्रवेशासाठी प्राधान्य दिले आहे. यंदा बारावीच्या वाढलेल्या निकाल पाहता नव्वद टक्के गुण मिळवून सुद्धा विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पहावी लागणार आहे.