ABP News

दहावीच्या परीक्षांबाबतची मुंबई हायकोर्टातील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब,परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम

Continues below advertisement

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभमीवर राज्य सरकार दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असताना परीक्षा घेण्याचा याचिकाकर्त्यांचा हट्ट का? राज्यात कोरोनाचा धोका असताना आम्ही आमच्या विशेष अधिकारात ही परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी उपस्थित केला. राज्य सरकारनं नुकताच या परीक्षा रद्द करण्याचा नव्यानं अध्यादेश जारी केल्यानं या याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाकडे मागितली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही परवानगी देताना परीक्षा का घेतली जावी? याबाबत याचिकेत सविस्तर मुद्दे उपस्थित करण्याचे निर्देष देत सुनावणी गुरूवार 3 जूनपर्यंत तहकूब केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram