MHADA च्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या, MPSC ची परीक्षा त्याच दिवशी असल्यानं निर्णय
MHADA Exam : पेपरफुटीमुळे म्हाडाच्या पुढे ढकललेल्या परीक्षा 29 जानेवारी 2022 रोजी घेतल्या जाणार आहेत. पण याच दिवशी MPSCच्या पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी मुख्य परीक्षा आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.