FYJC CET Cancelled : राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका, अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाकडून सीईटी रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola