पुणे : डीएस कुलकर्णी प्रकणातील सरकारी वकील बदलेले
डीएसके प्रकरणी नेमण्यात आलेले सरकारी वकील बदलले आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील गैरहजर होते. त्यांच्या जागी उज्ज्वला पवार या दुसऱ्या वकील हजर होत्या. डीएसके प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे न्यायालयात सुनावणी सुरु आहे. उज्ज्वला पवार यांनी तपास अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी न्यायालयाकडून अधिक वेळ मागितला आहे. दुपारी ३ वाजता या सुनावणीला पुन्हा सुरुवात होणार आहे.