नवी दिल्ली : रेल्वेचा 'तिसरा डोळा', देशभरातील प्रकल्पांवर नजर ठेवणार
Continues below advertisement
देशात सर्वात मोठं जाळं असणारं कुठलं सरकारी खातं असेल, तर ते रेल्वे मंत्रालयाचं. आपला हा भव्य पसारा सांभाळण्यासाठी रेल्वेच्या मदतीला येणार आहे आता एक गुप्त तिसरा डोळा. या तिसऱ्या डोळ्यातून दिल्लीतल्या रेल भवनाची नजर देशभरातल्या रेल्वे प्रकल्पांवर असणार आहे.
भारतीय रेल्वेने आपल्या देशभरातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात झालेलीच होती. पण यापुढे रेल्वे प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी, ट्रॅकची देखभाल कशी चालू आहे हे पाहण्यासाठी आणि रेल्वेच्या इतर महत्वाच्या बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचं रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलंय. आज यासंदर्भातलं अधिकृत पत्रक काढून या निर्णयाची माहिती देण्यात आलीय.