VIDEO | 'देवदर्शनाला जाऊ नका देव मीच आहे' लोकसभेचे भाजप उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वरांचं विधान | सोलापूर | एबीपी माझा
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या एका वादग्रस्त विधानाची व्हीडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. सुट्टीच्या काळात देवदर्शनाला जाऊ नका. तुळजाभवानी किंवा पंढरपूरचा विठ्ठल तुमचं ऐकणार नाही किंवा तो तुमच्याशी बोलणारही नाही. पण बोलणारा देव मी आहे, असं विधान सिद्धेश्वर स्वामी एका सभेत केलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजपकडून सारवासारव करण्यात येत आहे. पण विरोधकांना मात्र हे आयतं कोलित मिळालं.