Subramanian Swamy | डॉ. सुब्रमण्यम स्वामींचा राजकीय बॉम्बस्फोट | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन नायिका मागणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करता येईल? याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी संशोधन करत आहेत. स्वतः स्वामी यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. तसेच याबाबात काही माहिती असेल तर सुचवा, असे आवाहनही स्वामींनी केले आहे. स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मी सध्या लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचा अभ्यास करत आहे. एखाद्या मंत्र्याने प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन नायिकांची मागणी केली होती. त्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याअन्वये कारवाई करता येईल? याबाबत मी अभ्यास करत आहे. काही सूचना असतील तर कळवा. मी संशोधन करत असलेल्या सध्याच्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात ते उपयोगी पडेल."
Continues below advertisement