Dr.Payal Death Case | डॉ. पायलच्या कुटुंबियांच्या भेटीला गिरीश महाजन | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली नसून तीची हत्या झाल्याचा आऱोप पायलच्या आई-वडिलांनी केला. पायलच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नायर रुग्णालयाबाहेर पायलचे आई-वडील आंदोलन केलं. मुलीच्या आत्महत्येनंतर नायर रुग्णालयाकडून पायलच्या आई-वडिलांशी अद्याप कोणताही संपर्क झाला नसल्याचं पायलच्या आई-वडिलांनी म्हटलं.

पायलच्या आत्महत्येआधी पायलला होणाऱ्या छळवणुकीची माहिती रुग्णालयाच्या डीनला दिली होती. मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप डॉ. पायल तडवीच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉ. पायलच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या नायर रुग्णालयातील डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे या तिन्ही आरोपी महिला डॉक्टर सध्या फरार असून त्यांना रुग्णालयानं निलंबित केल्य़ाची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram