डोंबिवली : अनधिकृत बांधकामांविरोधात सामाजिक कार्यकर्त्याचं अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

Continues below advertisement
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केलं. अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग अधिकाऱ्यांच्या दालनात निंबाळकर य़ांनी कुटुंबियांसह आंदोलन केलं. मागील वर्षभरापासून एका मंदिराच्या अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईसाठी निंबाळकर यांचा पाठपुरावा सुरु आहे. गेल्या वर्षी यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला होता. आता माझा जीव गेल्यावरच कारवाई होणार का, असा सवाल निंबाळकर विचारत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram