मुंबई: शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या मदतीसाठी कला विश्व डोंबिवलीत
Continues below advertisement
कला ही कोणत्याही कलाकाराचा आत्मा, श्वास समजला जातो. या कलेचं काही नुकसान झालं तर काय होऊ शकतं हे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्यापेक्षा दुसरं कोण सांगू शकेल? मात्र त्यांना या धक्क्यातून बाहेर काढण्याबरोबरच मदतीचा हातही देण्यासाठी आख्खं कलाविश्व डोंबिवलीत एकत्र आलं होतं. सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश बाळ जोशी, सुलेखनकार अच्युत पालव, शिल्पकार चंद्रजित यादव, चित्रकार विशाल वाडये, निलेश भारती आणि व्यंगचित्रकार निलेश जाधव हे सर्व दिग्गज कलाकार डोंबिवलीत जमले होते. शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा नगरमधील कला स्टुडिओ काही आठवड्यांपूर्वी भीषण आगीत भस्मसात झाला. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी डोंबिवलीकर आर्ट संस्थेच्या माध्यमातून सर्व कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणण्यात आलं होतं.
Continues below advertisement