डोंबिवली | गोग्रासवाडीत काळ्या तिळापासून बनवलेल्या गणेश मूर्तीला विठ्ठलाचं रुप
डोंबिवलीच्या गोग्रासवाडीत सार्वजनिक मंडळाने यंदा तिळापासून बनलेली गणेशमूर्ती बसवली आहे. काळ्या तिळापासून बनवलेल्या या मूर्तीला विठ्ठलाचं रुप देण्यात आलं आहे. त्यामुळे ही मूर्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गणपतीची ही चार फुटांची मूर्ती आहे. बाप्पांच्या आजूबाजूला असेलेली संपूर्ण आरासही इकोफ्रेंडली करण्यात आली आहे.