बेकफास्ट न्यूज : मुंबईत धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशाचे प्राण आरपीएफ जवानाने वाचवले
डोंबिवली स्टेशनवर धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या एका प्रवाशाचा जीव आरपीएफ जवानाने वाचवला आेहे. काल दुपारी सव्वा चार वाजता डोंबिवली स्टेशनवर ही घटना घडली. धावती लोकल पकडताना एक प्रवासी पडत असतानाचं लक्षात येताचं, घटनास्थळी दाखल असलेला आरपीएफ जवान योगश कुमार याने प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचे प्राण वाचवले.