डोंबिवली : वाढत्या रेल्वे अपघातांच्या निषेधार्थ मूकमोर्चा

Continues below advertisement
रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या अपघातांचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीत रेल्वे प्रवाशांनी मूक मोर्चा काढला. डोंबिवली, कोपर, दिवा परिसरात मागील काही दिवसात लोकलमधून पडून प्रवाशांच्या मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच रजनीश सिंग या प्रवाशाचाही ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. डोंबिवलीत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतेय आणि लोकल्सची संख्या मात्र कमी आहे. वारंवार निवेदनं देऊनही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने तोंडाला काळ्या फिती लाऊन निषेध मोर्चा काढला गेला. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला गेलाय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram