डोंबिवली : मनसेचे नगरसेवक हफ्ते घेतात, फेरीवाला संघटनेचा गंभीर आरोप
डोंबिवलीत मनसे नगरसेवक राहुल चितळे आणि विरोधी पक्षनेते मंदार हळबे फेरीवाल्यांकडून हफ्ते घेत असल्याचा आरोप फेरीवाला संघटनेने केला. विशेष म्हणजे याबाबतचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध असून राज ठाकरे आता यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पालिकेतील फेरीवाला विरोधी पथकावरही टिका केली. या पथकात नेमणूक होण्यासाठी पालिकेत एक ते दीड लाखाचा रेट सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. कारण खालपासून वरपर्यंत सगळेच फेरीवाल्यांकडून हफ्ते घेतात. असा आरोप फेरीवाल्यांचा आहे.