डोंबिवली : महापालिकेने पुनर्वसन न केल्याने फेरीवाल्यांचा मोर्चा
कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा फेरिवाल्यांचं बस्तान बसल्यानंतर मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे केडीएमसीने फेरीवाल्यांसाठी रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर परिसरात पांढरे पट्टे मारले. मात्र एकिकडे पालिका फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा विषय टाळतेय पण पांढरे पट्टे मारण्याची घाई केली जातेय, असा आरोप करत फेरीवाल्यांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी मोर्चा रस्त्यातच अडवून माघारी फिरवला.