Godwin Jewelers | 'गुडविन'च्या मालकाची मर्सिडीज पोलिसांकडून जप्त | डोंबिवली | ABP Majha

Continues below advertisement

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात पोलिसांनी गुडविनच्या मालकाची महागडी मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात ही गाडी ठेवण्यात आलीये. गुडविनचा मालक सुनील कुमार याच्या स्वतःच्या नावावर ही गाडी रजिस्टर आहे. ही गाडी एका मोठ्या गुंतवणूकदाराला गॅरंटी म्हणून देण्यात आली होती. मात्र फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही गाडी पोलिसांनी उचलून आणली. सोबतच गुडविन ज्वेलर्सच्या मालकांचे पलावा सिटीतले दोन फ्लॅट्सही पोलिसांनी सील केले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram