डोंबिवली : अपहरणाचा गुन्हा मागे घेण्यासाठी गावगुंडांची तरुणाला बेदम मारहाण

Continues below advertisement

अपहरणाचा गुन्हा मागे घ्या नाहीतर घरात घुसून मारू अशी धमकी देत डोंबिवलीमध्ये गुंडांनी एका तरूणाला बेदम मारहाण केली आहे.
डोंबिवलीतल्या पिसवली मार्गावर असलेल्या दुर्गा इमारतीनजीक बिंदास म्हात्रे आणि सूरज म्हात्रे गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी बिंदाससोबत जुना वाद असलेले काही गावगुंड तिथं आले आणि त्यांनी सूरज म्हात्रेला धमकी देत त्याच्या पोटात धारधार शस्त्रानं वार केले. तसंच इतर कुणी याला मदत केली तर त्यांना जिवंतही सोडणार नाही अशी ताकीदही त्यांनी रस्त्यावरील नागरिकांना दिली. या हल्ल्यात सूरज गंभीररित्या जखमी झाला असून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सूरजचा मोठा भाऊ बिंदास यानं या गावगुंडांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram