डोंबिवली : आदित्य ठाकरेंचा गरब्यावर ठेका
Continues below advertisement
शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा असतो, त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवीन दिशा देतील, असं सूचक वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलंय. डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या गरब्याला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. सध्या शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान गरब्याच्या या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह खुद्द आदित्य ठाकरेंनीही ठेका धरला होता.
Continues below advertisement