दोन एप्रिलला डॉक्टरांचा देशव्यापी संप
Continues below advertisement
येत्या 2 एप्रिलला देशव्यापी संप पुकारण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असून, या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. हे विधेयक गरीब विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणार असल्याचे मत डॉक्टरांचे आहे.
25 मार्चला दिल्लीत नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात डॉक्टरांनी महापंचायत आयोजित केली होती. या मेळाव्याला देशभरातून 25 हजार डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी आले होते. या महापंचायतीत संपाचा निर्णय घेण्यात आला.
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक हे वैद्यकीय व्यवसायाच्या विरोधात असल्याची भावना डॉक्टरांची आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील डॉक्टरांच्या विरोधातील मुद्दे काढून टाकण्याची डॉक्टरांची मागणी आहे.