मुंबई : डी के जैन महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डी के जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमित मलिक यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक घेण्यास होकार दिला. त्यानंतर आता जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन हे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. डी. के. जैन हे १९८३ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. डी के जैन यांच्यासोबत मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची नावंही चर्चेत होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी जैन यांच्या नावाला पसंती दिली आहे. 25 जानेवारी 1959 साली जन्मलेले डी के जैन हे मूळ राजस्थानचे आहेत. 25 ऑगस्ट 1983 रोजी महाराष्ट्र राज्याच्या सेवेत रुजू झाले. त्यांचं एमटेक मेकॅनिक आणि एमबीएपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram