विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी | मुंबई | एबीपी माझा
मागासवर्ग आयोगाचा अहवाल, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावरुन आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. मराठा आरक्षणासंबंधीचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडा, या मागणीसाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी आग्रह धरला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. विरोधकांच्या मनात खोट आहे. त्यांना समाजात भांडणं लावायची आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. विधानपरिषदेतही विरोधक आणि सत्ताधारी नेते आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.