विहिंपच्या हुंकार रॅलीत आखाडा परिषद सहभागी होणार नाही | नागपूर | एबीपी माझा
विश्व हिंदू परिषद आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेतला वाद चांगलाच उफाळल्याचं दिसत आहे. विहिंपच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय आखाडा परिषदेने घेतला आहे. 25 तारखेला नागपूर, अयोध्या आणि बंगळुरुत विहिंपच्या वतीने हुंकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकारांच्या प्रश्नावरुन हिंदुत्ववादी संघटनांमध्ये हा वाद निर्माण झाला आहे.