VIDEO | जेव्हा कलावंत पूरग्रस्तांसाठी धावतात, लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांच्याशी बातचीत | ABP Majha
आज आपल्यासोबत आहेत लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे. मंगला ताईंनी त्यांचं अवघं आयुष्य वेचलं ते लोककलेसाठी. पण या लोककलेचा निस्मिम चाहता ज्या कोल्हापूर सांगलीमध्ये आहे, त्या नागरिकांवर ओढावलेल्या पुरामुळे कलावंतामधील दाते आपल्याला दिसत आहेत.
मंगला बनसोडे यांनीदेखील आता या पूरग्रस्तांसाठी खूप मोठी मदत पाठवायला सुरूवात केली आहे. त्यासाठी त्यांना खंबीर साथ आहे त्यांच्या मुलांची आणि कुटुंबाची. ज्या रसिकांनी आयुष्यभर मंगलाताई यांच्या कलेचा सन्मान केलाय ते नागरिक आज पुरात जगण्यामरण्याची लढाई देत आहेत हे मंगलाताईंसाठी अतिशय वेदनादायी आहे. आयुष्यभरातल्या कमाईचा मोठा भाग पूरग्रस्तांना देणाऱ्या मंगलाताई आज आपल्यासोबत आहेत.