Aarey Carshed | मेट्रो-3साठी आरेतील वृक्षांची कत्तल टाळता येईल का? महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी बातचीत | ABP Majha

Continues below advertisement
आरे वाचवा- मुंबई वाचवा या घोषणा सध्या घुमतायत मुंबईतल्या आरे कॉलनीतल्या हरितपट्ट्यात. सध्या मुंबईमध्ये ज्या मेट्रो-३ मार्गाचं काम सुरू आहे त्याची कारशेड आरे वसाहतीत उभारण्याचा निर्णय झालाय. कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा २३ हजार कोटींचा प्रकल्प आहे. आता कारशेडसाठी साधारण २ हजार ७०० वृक्षांची कत्तल करणं भाग आहे. आणि या त्याला राजकीय विरोधापासून ते पर्यावरणवाद्यांपर्यंत सध्या प्रचंड विरोध होतोय.

मानवी साखळी करून कलाकार, सर्वसामान्य, केवळ विरोधी पक्षातीलच नाहीत तर अगदी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनं याला तीव्र विरोध केलाय. कारशेडसाठी वृक्षतोडीला विरोध करत आरेला हातही लावू देणार नाही असं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तर वृक्षतोडीशिवाय मेट्रो ३ प्रकल्प अशक्य असल्याचं एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडेंपासून ते मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या अनेकांनी म्हटलं आहे. आता हा सगळा विरोध पाहात पुढे काय? यातून मार्ग कसा निघणार? मुळात याला काही पर्याय उभा राहू शकतो का.? असे तुमच्या आमच्या मनातले अनेक प्रश्न आपण आज विचारणार आहोत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram