
विरोधकांची एकजूट : 1988 आणि 2018
Continues below advertisement
कर्नाटकात आज भाजप विरोधात जी एकजूट पाहायला मिळाली... असंच काहीसं चित्र १९८८ ला पाहायला मिळालं होतं. मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस विरोधात भाजप आणि अन्य पक्षांनी एकत्रित येत एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात भाजपचे अटलबिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, राष्ट्रीय लोक दलाचे अजित सिंग, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव, कम्यूनिस्ट पक्षाचे ज्योती बसू यांनी एकत्र येत काँग्रेसविरोधात मोहीम उघडली होती. त्याचं पुढे काय झालं हे सर्वश्रूत आहेच. आज बरोबर ३० वर्षांनतर कुमारस्वामींच्या शपथविधीला भाजप विरोधातील विरोधकांच्या या एकजूटीचं पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Continues below advertisement