स्पेशल रिपोर्ट : धुळे : जमिनीसाठी झिजणाऱ्या धर्मा पाटलांच्या गावात 'एबीपी माझा'
Continues below advertisement
देश प्रजासत्ताक होऊन 68 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे इथे प्रजेची सत्ता प्रस्थापित झाली. पण त्याच प्रजेचा सर्वात मोठा भाग असलेल्या शेतकऱ्याला मात्र अजुनही असं वाटत नाही. आपला देश कृषि प्रधान आहे... हे शाळेत असल्यापासून कानावर पडतं. पण आपला देश कृषिसत्ताक मात्र कधीच झाला नाही. प्रजासत्ताक दिनी इतकं नकारात्मक बोलण्याचं कारण म्हणजे आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी 80 वर्षांच्या एका शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आणि आपण झेंड्याला फक्त वंदन करत राहतो. धर्मा पाटील सध्या रुग्णालयात मृत्यूशी झगड आहेत. त्यांची हीच व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो त्यांच्या मूळ गावी. धुळ्यातल्या विखरणमध्ये.
Continues below advertisement