धुळे : एसटी महामंडळाकडून तब्बल 30 टक्के भाववाढीचा प्रस्ताव
Continues below advertisement
एसटीनं प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण एसटी महामंडळानं तब्बल 30 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. डिझेल दरवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि महामार्गावरील टोल दरात झालेल्या वाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. पडणारा आर्थिक बोजा पाहता महामंडळाने ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करूनपरिवहन मंत्री आणि अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसच्या ४५६ रुपये असलेल्या भाडे दरांत १३४ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. हा प्रवास थेट ५९० रुपयापर्यंत जाईल. तर अन्य मार्गावरीलही साध्या आणि वातानुकूलित बसच्या भाडय़ातही मोठी वाढ होऊन प्रवाशांच्या खिशाला कात्रीच लागेल. यावर मात्र अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
Continues below advertisement