धुळे : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारले
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राईनपाड्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारले आहेत. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होणार नाही, मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेहांना हात लावणार नसल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं होतं.
दरम्यान, राईनपाडा गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आतापर्यंत याप्रकरणात २३ जणांना अटक झाली आहे. तर भीतीपोटी अनेक गावकऱ्यांनी गावातून पळ काढला आहे. मृत पाचही जण हे मूळ सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याच्या खवेगावातील होते.
नाथपंथीय डवरी समाजाचे असणारे हे पाचही जण काल भिक्षुकीसाठी धुळ्याच्या साक्री तालुक्यात असणाऱ्या राईनपाडा इथं आले होते. मात्र हे पाचही जण मुलं पळवणारे आहेत, या अफवेवर विश्वास ठेऊन लोकांनी त्यांना निर्घृणपणे मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.