मुंबई : धर्मा पाटलांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांचा संताप, विखरण गावात रास्तारोको

Continues below advertisement
सरकारच्या अनास्थेमुळे धर्मा पाटलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शेतकरी एकवटले आहेत. धर्मा पाटलांच्या गावातील शेतकऱ्यांना रास्ता रोको करुन सरकारचा निषेध सुरु केला आहे. तर इकडे मुंबईत धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी जे जे रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. योग्य मोबदल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram