धुळे : जयकुमार रावल यांच्या जमिनीची चौकशी करा, माजी आमदार हेमंत देशमुख यांची मागणी
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या विविध ठिकाणी असलेल्या जमिनींची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केलीय. तसंच कोट्यवधींची लाच मिळत असल्यानं मुख्यमंत्री रावलांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही हेमंत देशमुख यांनी केलाय. विखरण इथली जमीन रावल यांनी विकत घेतल्याचे दस्तावेजही यावेळी हेमंत देशमुख यांनी दाखवले. तसेच आपल्याविरोधात रावल यांनी याप्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा असं आव्हानही त्यांनी दिलंय