धुळे : अवकाळी पावसामुळे शेतमालाचं नुकसान, शेतकरी हवालदिल
Continues below advertisement
धुळे, पंढरपूर आणि बीडमध्ये गारपिटीसह पावसानं हजेरी लावली. धुळ्यात डाळींब, कांदा तसंच फळबागांचं नुकसान झालंय, तर वीज पडून पंढरपुरात 1 ठार आणि बीडमध्ये 4 जण जखमी झालेत. याबरोबर सातारा, नगर, अशा ठिकाणीही शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पुढचे दोन दिवस गारपीट आणि अवकाळी पाऊस होण्याचा इशारा कायम आहे. त्यामुळे योग्य ती उपाय योजना करण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
Continues below advertisement