धुळे : चॉकलेटचं आमिष दाखवून 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी मोकाट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चॉकलेटचं अमिष दाखवून एका 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा मध्ये घडली आहे.
8 फेब्रुवारीला इथल्या नूतन प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या पडक्या घरात नेऊन अज्ञात व्यक्तीनं तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र अद्यापही आरोपी मोकाट आहे. सध्या पीडित बालिकेवर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान संबंधित शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या चिमुरडीच्या कुटुंबियांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून केली.