धुळे : मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Continues below advertisement
धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात झालेल्या ५ हत्यांनंतर मृतांच्या नातलगांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर इथल्या रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आले आहेत. दरम्यान दुसरीकडे राईनपाडा गावात तणावपूर्ण शांतता आहे. आतापर्यंत याप्रकरणात २३ जणांना अटक झाली आहे. तर भीतीपोटी अनेक गावकऱ्यांनी गावातून पळ काढला आहे. मृत पाचही जण हे मूळ सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याच्या खवेगावातील होते. दरम्यान मृत कुटुंबाचं पुनर्वसन झाल्याशिवाय मृतदेहांवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय मंगळवेढ्यातील गोसावी समाजानं घेतलाय
नाथपंथीय डवरी समाजाचे असणारे हे पाचही जण काल भिक्षुकीसाठी धुळ्याच्या साक्री तालुक्यात असणाऱ्या राईनपाडा इथं आले होते. मात्र हे पाचही जण मुलं पळवणारे आहेत, या अफवेवर विश्वास ठेऊन लोकांनी त्यांना निर्घृणपणे मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram