धुळे : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून विसर्ग सुरु
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळं किमान दहा गावांसह धुळे शहराचा काही भागाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. डाव्या कालव्याच्या पाटचारीच्या माध्यमातून किमान 35 किलोमीटर अंतरातील लहान ,मोठे बंधारे देखील भरण्यात येतात. हे सगळे बंधारे भरल्यानं शेतातील विहरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन याचा फायदा पीक लागवडीसाठी होणार आहे. किमान एक हजार हेक्टर शेत जमीन यामुळं ओलिताखाली येणार असल्याची माहिती मिळते आहे.