धुळे : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया
धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून मुंबई- आग्रा महामार्गाजवळ पाणीचपाणी झालं. बाभळे जलशुद्धीकरण केंद्रापासून अवघ्या काही अंतरावर ही जलवाहिनी फुटली. एअर व्हॉल्वजवळच जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं. काही दिवसांपूर्वीच या जलवाहिनी गळतीचे काम मनपा हाती घेऊन पूर्ण केल्याचा दावा केला होता.