धुळे हत्याकांड: आतापर्यंत 23 जणांना अटक
Continues below advertisement
धुळे जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी समजून जमावानं केलेल्या मारहाणीत ५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता पोलिसांनी मारहाण करणाऱ्या २३ जणांना अटक केली आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात काल ही घटना घडली होती. मुलं पळवण्याच्या संशयातून पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राईनपाडा गावात नागरिकांनी 5 जणांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना ग्रामपंचायतच्या खोलीत डांबण्यात आलं. तिथंही त्यांना बेदम मारहाण झाली. यावेळी संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडलेला दिसला. मारहाण झालेले एका कोपऱ्यात विव्हळत असतानाही त्यांच्यावर उपचार करायचे सोडून, जमावाकडून त्यांना मारहाण सुरुच राहिली. आणि त्यातचं या पाचही जणांचा जीव गेला..