VIDEO | नाटक, सिनेमा आणि कर्करोग, अभिनेते रमेश भाटकर यांची संग्रहित मुलाखत | ढॅण्टॅढॅण | एबीपी माझा

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश भाटकर यांना कर्करोग झाला होता. त्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आपल्याकडे अवघे काही दिवस शिल्लक असल्याचं त्यांना कळलं. त्यामुळे शेवटचे दिवस काम करायचं या इराद्याने पुन्हा एकदा ते मोठ्या पडद्यावर झळकले होते. नुकत्याच आलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा साकारली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola